आपल्या लाडक्यांसाठी खेळ निवडताना…

आजकलच्या या काळात जिथे प्रसारमाध्यमांमुळे प्रत्येक खेळाचे व खेळाडूच जीवन आपल्याला जवळून बघायला मिळतयं तिथेच आपल्या मुलाला तसंच बनवण्यासाठीची पालकांची तगमग मोठ्या प्रमाणात दिसून येते. हे करण्यासाठी महत्त्वाचा एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे या खेळात माझ्या मुलाने मुलीने आपले करीयर कसे करावं किंवा fitness म्हणून खेळ निवडताना पण कुठला निवडावा. त्याबाबतआजऱ्या या article मध्ये सविस्तर माहिती घेऊया.

‘क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला सचिन तेंडुलकर म्हणूनच जन्माव लागेल” अशी धारणा आता हळू हळू कमी होत चालली आहे. प्रत्येक मुलगा हा वेगळी कौशल्ये or skills हे  घेऊन जन्माला आलेला असतो. ते ओळखून त्यावर  विचार करणे गरजेचे आहे. obesity or लट्ठपण याचे प्रमाण वाढत असताना, तसेच ६ मुलांपैकी १ मुलगा लट्ठपणाचा शिकार होत असताना त्यांनी व्यायाम करतो, किंवा fitness म्हणून एखादा खेळ निवडले फायद्याचे उरते. खेळ तुम्ही फिटनेस म्हणून, करियर म्हणून की विरंगुळा म्हणून निवडलाय यावर कुठल्या प्रकारचा  निवडायचा हे अवलंबून आहे.

आजच्या मोबाईल आणि टिबीच्या काळात मैदानी खेळ खेळणे अगदी कमीच झाल्यासारखे जाणवते, मैदानी खेळ खेळल्याचे फायदे मात्र अफाट आहेत

सांघिक खेळ खेळल्याने मुलांची शारिरीक वाढ होण्यास मदत होते.  हाता पायांचे coordination, गतिशीलता, चपळता हे सर्व वाढण्यात मदत होते. पण त्याचबरोबर दुसऱ्याशी जुळवून घेण्याची क्षमता, पण त्यांची खिलाडूवृत्ती, संघभावना (team spirit) एकजुटीने एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्याची क्षमता प्रस्थापित होते यामुळे आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. अबोल किंवा शांत मुलांना दुसऱ्याशी बोलून मैत्री करणे यांसारखे कौशल्य जोपासायला मदत होते. तसेच खेळामुळे किंवा शारिरिक व्यायामामुळे शरीरात feel good hormones किंवा happy hormones तयार होतात. ज्यामुळे माणसाला आनंदी राहता येते आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच हार-जीत यासारख्या जीवनातील चढ उतारणबरोबर सामना करण्याची सवय लागते. त्यामुळे विचारांमध्ये परिपक्वता (maturity) येते.

● आपल्या मुलासाठी खेळ निवडताना या गोष्टींचा नक्की विचार करा……

१. तुमच्या मुलाची कौशल्ये आणि strengths काय आहेत.

२. मुलगा introvert (शांत व अबोल) आहे का extrovert (बोलका व मनमिळाऊ) आहे याचा विचार करा. शांत व अबोल मुलांना साधारणपणे individual Sport म्हणजे जिथे team चा समावेश नसतो असा प्रकारचे खेळ देणे जास्त श्रेयस्कर ठरते तसेच बोलक्या लोकांना team games फायदेशीर ठरतात.

३. फक्त एखाद्या खेळाचे फायदे खूप आहेत किंवा पूर्वी तुम्ही तो खेळ खेळला आहात म्हणून तुमच्या मुलाला त्या sport मध्ये घालणे बरोबर नाही, तुमच्या मुला-मुलीच्या आवडीचाही आदर करणे तितकेच महत्त्वाचे आहे

४. एखादा खेळ निश्चित करण्याअगोदर तुमच्या मुलाला 2-3 वेगवेगळ्या खेळांमध्ये घालून त्याची आवड व त्याची क्षमता तपासा. फक्त एखादा खेळ आवडतो म्हणून त्याची निवड करणे धोक्याचे ठरू शकते. त्यासाठी लागणारी कौशल्ये तज्ञ डॉक्टर अर्थात फिजिओथेरेपीस्ट कडून तपासून घेणे आवश्यक आहे. 

५. वयाच्या कुठल्याही वयात किंवा असलेल्या कौशल्यांमध्ये खेळ खेळण्यासाठी तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या.

६. काही विशेष असे ध्येय तुमच्या मनात असेल तर तुमच्या मुलांशी मोकळेपणाने ते बोला. चर्चा करून व मुलाच्या ध्येयाचा पण विचार करून मग खेळ निश्चित करा.

७.  खेळाचा उपयोग हा बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही वाढीसाठी होतो.

→ जर मुलाची एकाग्रचित्तता वाढवायची असेल तर बुद्धिबळ, badminton, table tennis सारखे खेळ निवडावे.

→ जर मुलाची चपलता वाढवायची असेल तर तर athletics, running, football, खो- खो सारखे खेळ निवडा.

 →कबड्डी Hockey सारख्या खेळांना चपळतेबरोबर ताकद व endurance (फुप्फुसांची व स्नायुनंची कार्यक्षमता) पण जास्त असावी लागतो, मग अशा खेळांची निवड करून ताकद व कार्यक्षमता तर वाढतेच व तसेच team game चे फायदे मिळतात, संघभावना प्रबळ होते.

→लवचिकता वाढवायची असेल तर gymnastics तसेच भारतीय खेळ जसे मल्लखांब यांसारख्या खेळाचा पण विचार करू शकता.

खेळ कुठलाही असो त्या खेळाचे शिक्षण सखोल घेऊन त्याचा सतत सराव केल्यानेच खेळात प्राविण्य प्राप्त होते. जर तुम्हाला सानिया मिर्झा, सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा किंवा अगदी विराट कोहली जरी व्हायचे असेल तर सातत्य आणि सराव हेच तुम्हाला यश प्राप्त करून देतील. तुमच्या पाल्याला त्या स्तरावर पोहोचवण्यासाठी तुम्ही पालक म्हणूनही तितकेच कष्ट करणे, त्यांच्या सरावाला आणि फिटनेस ला महत्त्व देणे व  ते  सुरु ठेवण्यासाठी लागेल ती मदत करणे महत्त्वाचे आहे.

एक महत्त्वाची गोष्ट आजकल पालकांमध्ये कमी प्रमाणात दिसून येते ती म्हणजे खिलाडूवृत्ती. खेळ शिकण्याच्याआधी तुम्ही तुमच्या मुलाला खिलाडूवृत्ती शिकवणे गरजेचे आहे. खेळाचे प्रशिक्षण घेत असताना हार-जीत हा खेळाचाच भाग आहे व खेळात हरणे जिंकण्यापेक्षा सहभागी होणे महत्त्वाचे आहे ही बाब जर मुलांना शिकवली तर त्यांच्यावरील तणाव कमी होऊन त्यांना खेळात अधिक-अधिक प्रगती करता येते.

काही तज्ञ फिजिओथेरेपीस्ट या विषयामध्ये मार्गदर्शन करतात. कुठल्याही खेळात कौशल्य/यश मिळवता येईल का नाही हे थोड्या प्रमाणात मुलाचा शारीरिक व बौद्धिक क्षमतेवर ठरते. हीच क्षमता कुठल्याही खेळात शिरण्याआधी फिजिओथेरेपीस्ट कडून तपासून घेता येते. एकदा खेळ निवडून निश्चित झाला की त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी कोच सोबत फिजिओथेरेपीस्ट सुद्धा मदत करतात. या शिवाय, तुम्ही निवडलेल्या खेळासाठी लागणाऱ्या काही ठळक बाबी किंवा कौशल्ये (sports specific skills) याची तपासणी त्या त्या खेळातील तज्ञ सल्लागारांकडून करून घ्यावी.

तज्ञ फिजिओथेरेपीस्टचा सल्ला पुढील बाबींसाठी घेणे आवश्यक आहे.

  • muscle strength (ताकदीची तपासणी)
  • weak areas ( कमकुवत किंवा कमी कार्यक्षमतेची ठिकाणे)
  • हाता-पायांचे coordination
  • Agility (चपळता)
  • lung endurance (फुप्फुसांची कार्यक्षमता)

या सर्व गोष्टी नक्कीच तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतील!

एकदा खेळात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर; खेळाडू ला साथ द्यायला, खेळाडू आणि कोच इतकीच निपुण सपोर्ट टीम जमा करायला हवी. या सपोर्ट टीम मध्ये डॉक्टर, फिजिओथेरेपीस्ट, आहारतज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ, मसाज थेरेपीस्ट यांचा समावेश असतो. ही टीम खेळाडू चा तब्येतीची पूर्ण देखरेख करते व खेळात यश गाठायला महत्वाची मदत होते!

आपल्या लाडक्याला भारताचा निपुण खेळाडू बनवण्यासाठी शुभेच्छा!!

Dr. Aditi Dole (PT)

Check Your Shoulder
SOLUTIONS TO YOUR PAINFUL SHOULDER!

DO you have shoulder Pain? Or you know anybody with shoulder pain?*

DO you have shoulder Pain? Or you know anybody with shoulder pain?*

Can you sleep on your painful shoulder?

Can you sleep on your painful shoulder?

Can you lift your arm above your head easily?

Can you lift your arm above your head easily?

Have you stopped any activity because of shoulder problem?

Have you stopped any activity because of shoulder problem?

Can you take weight on your hands like in doing a plank

Can you take weight on your hands like in doing a plank

Contact us

Fill out the form below, and we will be in touch shortly.