धावण्यासाठी “फिट” बना!

बैठी जीवनशैली नको यासाठी नियमित चालणे/धावणे हा सर्वात लोकप्रिय व्यायाम आहे. यामुळे निश्चितच उत्तम व्यायाम होतो, पण पूर्णपणे “फिट” राहायला एवढेच पुरेसे आहे का? सगळे सांगतात म्हणून चालणे/धावणे सुरु करायचा आधी याचा थोडा विचार आवश्यक आहे….

धावणे हा अक्टीव राहण्यासाठी उत्तम आणि आवडीचा प्रकार नक्कीच आहे, पण संपूर्ण फिटनेस साठी फक्त तेवढेच पुरेसे नाही. पूर्व तयारी शिवाय सुरु केलेल्या धावण्याचा सुद्धा शरीरावर वेगळा ताण येतो. छोटी-मोठी दुखणी जाणवायला लागतात आणि मग व्यायामचा उत्साह कमी होतो आणि पळण्यातील मज्जा नाहीशी होते….

उत्साह कमी न होऊ देता धावण्याचे हे रुटीन कसे टिकवता येईल? याचा उपाय म्हणजे- धावण्यासाठी फिट बना, फिट बनण्यासाठी धावू नका!

७ जून हा दिवस जगभरात ‘रनिंग डे’ म्हणून साजरा केला जातो! रनिंग डे चा निमित्तानी जाणून घेऊया रनिंग साठी लागणाऱ्या फिटनेस विषयी थोडेसे…

मला पळताना काहीही त्रास होत नाही, मी पळण्यासाठी फिट आहे का??

धावताना काहीही त्रास न होणे उत्तमच आहे पण याचा अर्थ तुम्ही पळण्यासाठी पूर्णपणे फिट आहात असा नाही…

आजकाल सगळेच बैठ्या जीवनशैली चे बळी आहेत, यामुळे शरीरात नकळत बदल सुरु झालेले असतात. मानवी शरीर कधीच बसण्यासाठी बनले नव्हते, हा ताण आपण त्या बिचाऱ्याला देत आहोत. चालणे व धावणे या साठी बनलेले शरीर जेव्हा तासंतास बसून राहते तेव्हा स्नायुंमध्ये सूक्ष्म बदल होऊ लागतात, त्यांची ताकद व लवचिकता कमी होऊ लागते… यामुळे अचानक एक दिवस सुरु केलेला धावण्याचा व्यायाम नीट सोसत नाही व त्यामुळे स्नायूंना इजा होऊ शकते. 

याला वैद्यकीय भाषेत ‘muscle imbalance’ हे नाव आहे. हा काही आजार किंवा दुखापत नाही, पण सतत ताण येत राहिला तर स्नायूंना इजा होऊ शकते याचा हा संकेत आहे…. इजा होईपरंत याचा काहीही त्रास जाणवत नाही. सर्वात वेगवान धावपटू ला ही हा ‘muscle imbalance’ असू शकतो…

बैठ्या जीवनशैली मुळे स्नायुंमध्ये होणारे बदल-

दीर्घ काळ एका जागी बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये काही स्नायूंची लवचिकता कमी होते. याचा परिणाम म्हणून विरुद्ध दिशेचा स्नायूंची ताकद कमी होते. स्नायूंचा हा सूक्ष्म समतोल बिघडल्यामुळे स्नायू ची क्षमता कमी होते व इजा होऊ शकते.

साधारणतः खालील त्रास जाणवू लागतात-

  • पायात गोळे येणे
  • पाउले व नडगी चे दुखणे
  • पोटऱ्या जड वाटणे
  • कंबर दुखी
  • फारसे शारीरिक श्रम नसले तरीही स्नायू भरून येणे

ही सर्व लक्षणे सुरवातीला दुर्लक्षित केली जातात कारण नव्याने व्यायाम सुरु केलाय तर हे होणारच असे वाटणे स्वाभाविक आहे. पण हे सारखे-सारखे होत राहिले व त्यावर काही उपाय केला नाही तर याचेच रुपांतर एखाद्या मोठ्या इजेत होऊ शकते…

याचावर काही उपाय आहे काय?

हे वाचून चिंतेत पडला असाल तर चांगली बातमी ही आहे की हे पूर्णपणे बरे होते!! मुळात ही इजा नसल्यामुळे, वेळेत लक्ष दिले तर याचा काहीही त्रास जाणवत नाही.

कुठलीही लक्षणे/त्रास सुरु होण्याआधी याचावर काम केले तर ठरवलेला व्यायाम, चालणे, धावणे उत्कृष्ट रित्या करता येते!! नेहमीचा व्यायामामध्ये छोटेसे बदल करून, काही सोप्पे व्यायाम सुरु करून लगेच फायदा जाणवू लागतो.

तज्ञ फिजिओथेरपिस्ट तुमचा स्नायूंची ताकद आणि लवचिकता तपासून, हा बिघडलेला समतोल शोधून काढू शकतात. एकदा ही महत्वाची माहिती मिळाली की पुढचे व्यायाम अगदी सोपे होतात!

इजा झाल्यानंतर ती बरी होण्यासाठी हजारो प्रयत्न करण्यापेक्षा इजा होऊच नये यासाठी प्रयत्न करणे केव्हाही चांगले, नाही का? उत्साहानी सुरु केलेल्या धावण्याचा रुटीन मध्येही खंड पडणार नाही! नव्याने पळणे सुरु करण्याची इच्छा असलेला व्यक्ती, बरीच वर्षे सराव असलेला धावपटू, मारेथोन चे उत्साही सहभागी या सर्वांनाच यातून फायदा आहे!

मी कधीच stretching केल्याशिवाय धावत नाही, तरीही माझा स्नायूंची लवचिकता कमी असू शकते का?

व्यायामाचा आधी व्यवस्थित ‘warm-up’ व ‘stretching’ होणे निश्चितच अत्यंत महत्वाचे आहे, पण हे वर्षानुवर्ष आखडलेल्या स्नायूंसाठी नक्कीच पुरेसे नाही.

ह्या stretching ला ताकद वाढवणाऱ्या व्यायामांची जोड दिली नाही तर हे अगदी कुत्र्याची शेपूट सरळ करण्यासारखे व्यर्थ आहे! ताकद व लवचिकता वाढवण्याचे व्यायाम नियमित केल्यावर तुम्हाला स्वतःलाच धावण्यातील वेगळा आनंद जाणवू लागेल!

मी नियमित जिम करतो, माझी ताकद तर नक्कीच चांगली असणार….

ताकद म्हणजे फक्त ‘मला अमुक एक किलो वजन उचलता येते’ ही ढोबळ व्याख्या नव्हे! छान ताकद असलेला स्नायू कमीत-कमी कष्टात कुठलीही हालचाल करू शकतो! सांध्यांवर ताण न देता तो तुम्हाला व्यवस्थित हालचाल करू देतो! खरा ताकदवर स्नायू न थकता कोणत्याही कार्यात साथ देतो!

तुमचे ध्येय जर धावण्याचे असेल तर स्नायूला धावण्यासाठी सक्षम बनवायला हवे! या साठी पळताना कोणते स्नायू काम करतात याची जाण असणे महत्त्वाचे आहे…. त्यातला कोणता स्नायू आपल्या शरीरात कमकुवत आहे याचा शोध म्हणजे पुढची पायरी. तज्ञ फिजिओथेरपिस्ट तुमचा स्नायूंची ताकद आणि लवचिकता तपासून, हे माहिती तुम्हाला अचूक देऊ शकतो! नंतर या स्नायूला धावण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी सुद्धा फिजिओथेरपिस्ट चीच!!

         ही सर्व पूर्व तयारी करून धावणे सुरु करून बघा, त्यात निश्चितच वेगळी मजा आहे! एकदा काही इजा होणार नाही ही खात्री असली की मग; धावण्याचा वेग, निरनिराळ्या ठिकाणी पळायला जाणे, माराथोन सारख्या शरीयती-त्या पूर्ण करायला लागणारा वेळ या सारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते!! धावण्यातील नवा-नवीन ‘च्यालेन्जेस’ तुम्ही स्वीकारू शकता व ते यशस्वी करून दाखवू शकता!!

          म्हणूनच- धावण्यासाठी फिट बना, फिट बनण्यासाठी धावू नका!!

Dr. Shriya Joshi (PT)

Contact us

Fill out the form below, and we will be in touch shortly.