Physiotherapy, एक सुवर्णसंधी

जवळपास ९९% लोकांना अस वाटत असतं की फिजिओथेरपीचे उपचार एखाद्या डॉक्टरनी सुचविले किंवा लिहून दिले तरच करायचे असतात. आणि जर औषधाच्या गोळ्या घेऊन माझं दुखणं कमी होत असेल, तर  कोण फिजिओथेरपीला जाणार.

पेन किलर्स घेऊन आपण दुखणं तात्पुरतं बरं करू शकतो. माझ्या पायाचे फ्रँक्चर निघाल्यावर मीही तेच केलं. वेदना तर कमी झाल्या, पण सूज काही कमी होत नव्हती, नॉर्मल चालता येत नव्हतं, घोटा परत परत मुरगळायची भिती मनात घरं करून होती. मग हळूहळू चालणं, जिना वापरण, जमिनीवर बसणं टाळायला सुरवात झाली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार  फ्रँक्चर तर भरून आलं होत, काळजीचं काहीच कारण नव्हत. मग अस का होत होतं? कारण होत की स्नायूंमध्ये ताकद नव्हती, आणि ती व्यायाम केल्याशिवाय येणार नव्हती. पण व्यायाम काय करू ? परत पाय मुगळला तर?

मी मग फिजिओथेरपीस्टची मदत घ्यायचं ठरवलं. मला फिजिओथेरपीस्टनी नुसत चालायला किंवा जिना चढायला नाही शिकवलं, तर माझा गेलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला. खऱ्या अर्थानी पायावर उभं केल.

मागील जवळपास 30 वर्षे मी ओर्थोपेडीक्स विषयाशी संबंधित व्यवसायात आहे, अनेक नामांकित डॉक्टरांशी माझा व्यवसायामुळे परिचय होता. पण माझ्या अनुभवानी मला फिजिओथेरपी विषयाच महत्व पटवून दिलं.  मी मुळात राष्ट्रीय स्तरावर ज्यूडो चॅम्पियन होतो. त्यामुळे खेळाडूंसाठी काही तरी करायची इच्छा होतीच. मग विचार केला, किती दिवस पेन किलर्स,  व्हिटॅमिन्स, कॅलशिअम सप्लीमेंट घेत राहणार? शेवटी  ‘अंदर से स्ट्रॉंग’ होण गरजेचेआहे. फिजिओथेरपीचे व्यायाम नियमित करणं आणि  दुखण्याचं समूळ उच्चाटन करण हाच शाश्वत उपाय आहे.

फिजिओथेरपी विषयी काही समज किंवा जास्त गैरसमज असतात. कदाचित पुरेशी माहिती नसते. उदाहरणार्थ, फिजिओथरपी ही फ्रँकचर नंतर, सर्जरी नंतर किंवा स्ट्रोक नंतर करायचा उपचार आहे. परंतु आज फिजिओथेरपीची व्याप्ती खूप वाढली आहे.

अगदी बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत फिजिओथेरपिचे उपचार अत्यंत प्रभावी ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. बाळंच कशाला गरोदर मातांमध्ये तंदुरुस्त राहून नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी फिजिओथेरपीचे व्यायाम अत्यंत महत्वाचे ठरतात. बाळंतपणा नंतरही पूर्वीचा फिटनेस मिळवण्यात फिजिओथेरपीचा मोलाचा वाटा आहे.

Arthritis अर्थात संधिवाता मुळे आखडलेले सांधे, फिजियोथेरपीचे व्यायाम नियमित केल्यास बिना कुरकुर  Active राहतात.

गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा मानदुखी ही तर अत्यंत common दुखणी होत चालली आहेत. बदलती जीवनशैली हे एक कारण असेलही, परंतु योग्य व्यायामाचा अभाव हे मुख्य आहे.

बैठे काम करणाऱ्यांनी जर थोड्या थोड्या वेळाने फिजिओथेरपीस्टनी शिकवले हे सोपे सोपे व्यायाम (stretches) केले, तर ही दुखणी सहज टाळता येतात. Stich in time अर्थात आज सुरु केलेल्या या व्यायाम प्रकारांमुळे आपण उद्याची शस्त्रक्रिया ही टाळू शकतो.

 मध्यम वयात, साधारण चाळीशीच्या आसपास, जसे आपण रक्त तपासणी, BP तपासणी करून घेतो, त्याचप्रमाणे जर आपले सांधे, स्नायू हाडांची मजबूती यांचीही योग्य तपासणी केली तर अनेक दुखणी टाळता येतील.

कारण आपले स्नायू जर बळकट असतील, तर आपण Active राहतो, चालणे, पळणे इत्यादी व्यायाम करू शकतो. त्यामुळे आपोआप डायबेटीस, BP इत्यादी व्याधी कंट्रोल  मधे राहू शकतात. अगदी स्ट्रोक सारख्या आघातानंतरही फिजिओथेरपी मुळे ती व्यक्ती परत सामान्यपणे चालू शकते, हिंडू फिरू शकते.

फिजिओथेरपिचे हे सगळे फायदे असताना हा विषय इतका का दुर्लक्षित आहे? का लोकं औषधे घेतात? व्यायामाचा आळस करतात ? अगदी  शस्त्रक्रिया करायालाही तयार होतात….पण फिजिओथेरपि सारख्या उपचाराचा विचार करत नाहीत.याचं कारण आपण शोधलं तर एकच गोष्ट प्रामुख्याने लक्ष्यात येते कि,आत्तापर्यंत याविषयी सामान्य जनतेत अज्ञानचं होतं.परंतु आता माहिती तंत्राद्नायानाच्या युगात लोकांमधील जागरूकता वाढली आहे आणि नक्कीच त्रासदायक औषधं व त्यामुळे होणारे अपाय टाळण्यासाठी खूप जण फिजिओथेरपीचा पर्याय निवडू लागलेत.फिजिओथेरपीचा त्यांना चांगला फायदा मिळतोय.

WHOच्या एका सर्वे नुसार भारतामध्ये दर दहाहजार व्यक्तीन्मागे एका फिजिओथेरपिस्टची आवश्यकता आहे. सध्या हे प्रमाण फारच व्यस्त आहे,त्यामुळे तरुणांना फिजिओथेरपी हा एक उत्तम करियरचा मार्ग आहे.

फिजिओथेरपिस्ट म्हटलं की एक छोटंसं क्लिनिक,त्यात एक दोन मशीन घेऊन बसलेली व्यक्ति किंवा जर मोठा सेट-अप असेल तर मोठ्या हॉस्पिटलचा  फिजिओथेरपी विभाग आपल्या डोळ्यासमोर येतो.परंतु या क्षेत्रामध्ये पैसे गुंतवायला मोठे गुंतवणूकदार उत्सुक आहेत.ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.फिजिओथेरपीच्या विविध शाखांमधील चार-पाच फिजिओथेरपिस्टनी एकत्र येऊन टीम-वर्कमध्ये काम केलं तर ही टीम उत्तम रिझल्ट्स देऊ शकते.या प्रकारची क्लिनिक्स आता सुरु झाली आहेत आणि दिवसेंदिवस ती वाढतच जाणार कारण वाढत्या लोक्संख्येबरोबर व वाढत्या शहरीकरणाबरोबर ही आता काळाची गरज आहे.

वेगवेगळ्या खेळांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयपातळीवरील लीग आता सुरु झाल्या आहेत.या व्यावसायिक स्पर्धा आहेत,यातील खेळाडू व्यावसायिक आहेत,संघमालक प्रत्येक खेळाडू म्हणजे एक असेट समजतात.या असेटकडून जास्तीतजास्त फायदा मिळवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक खेळाडूची तंदुरुस्ती अत्यंत महत्वाची असते.यासाठी एक फिजिओथेरपिस्टची टीमच अशा संघांबरोबर असते.स्पोर्ट फिजिओथेरपी हे करियर निवड्नार्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

मागील पन्नास वर्ष्यात वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मनुष्याच्या सरासरी आयुष्यामानात चांगलीच वाढ झाली आहे,आजकाल सरासरी वय सत्तरीच्या पुढे चाललंय.पण यामुळे येणारं वृद्धत्व आणि त्या अनुषंगाने येणारं परावलंबी जीवन जर दूर ठेवायचं असेल तर औषधोपचारांबरोबरचं ‘शरीर नावाचं मशीन’ उत्तमरीत्या चालू ठेवायचं असेल तर फिजिओथेरपिस्टची मदत फार महत्वाची ठरते.

याच वयोगटात उद्भवणारे नुरोलोजीकल प्रॉब्लेम  एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना हतबल करून सोडणारे असतात.पक्षाघात,पार्किन्सन डिसीज,मल्टीपल स्क्लेरोसिस,चेहऱ्याचा पक्षाघात,सतत तोल जाण्यामुळे वारंवार होणाऱ्या दुखापती आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या यांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी एक फिजिओथेरपिस्टचं वयोवृद्धांना जवळचा आधार ठरतो.

तसंच एखाद्या  मोठ्या शस्त्रक्रियेनंतर किंवा एखाद्या आजारातून उठल्यानंतर शारीरिक क्षमता मूळ पदावर आणण्यासाठी आणि आपल्या हालचालीत सुसूत्रता आणण्यासाठी फक्त फिजिओथेरपिस्टचं तुमचा हात धरून उभा राहतो आणि तुमच्या कुबड्या अथवा walker फेकून द्यायला तुम्हाला स्फूर्ती देतो.एखाद्या फिजीसिअन अथवा सर्जनचं हे कामच नव्हे,त्यांनी त्यांचे औषधोपचार करावेत,शस्त्रक्रिया करावी आणि अशा रुग्णांना त्यांची गाडी पुन्हा रुळावर आणून ती पळवण्यासाठी फक्त फिजिओथेरपिस्टचं हवा!!  

एक फिजिओथेरपी क्लिनिक मध्ये लिहिलेलं वाक्य  परत परत आठवत राहत, A Physician Adds years to life, A Physiotherapist adds life to years..

लेखक, श्री.रवींद्र वर्तक, 

संस्थापक संचालक 

 ISO certified Physiotherapy Studio and Clinic

Check Your Shoulder
SOLUTIONS TO YOUR PAINFUL SHOULDER!

DO you have shoulder Pain? Or you know anybody with shoulder pain?*

DO you have shoulder Pain? Or you know anybody with shoulder pain?*

Can you sleep on your painful shoulder?

Can you sleep on your painful shoulder?

Can you lift your arm above your head easily?

Can you lift your arm above your head easily?

Have you stopped any activity because of shoulder problem?

Have you stopped any activity because of shoulder problem?

Can you take weight on your hands like in doing a plank

Can you take weight on your hands like in doing a plank

Contact us

Fill out the form below, and we will be in touch shortly.