GBS माहितीपत्रक

सध्या पुण्यात GBSनावाच्या आजाराने थैमान घातलय. गेल्या एकाच आठवड्यात 22 – 26 लहान मुले आणि मध्यम वयीन असे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत .

GBS झालेल्यांची तक्रार अशी होती:
“काल TV बघत बसले होते अचानक श्वास घ्यायला जड जात होते. मग धाप लागायला लागली. हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत उभंसुद्धा राहता येत नव्हत. अचानक पायातली शक्ती गेली त्यामुळे उभे राहता येत नवते आणि खूप भीती वाटत होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आयसीयू मध्ये ऍडमिट केले व ऑक्सिजन मास्क लावला. खूप आठवल्यावर लक्षात आले की मागच्या आठवड्यात पोट बिघडले होते. टेस्ट केल्यावर कळले की GBS झाला आहे.”

GBS (Guillain-Barrè Syndrome) हा आजार  Campylobacter jejuni या जंतूमुळे किंवा वायरल इन्फेक्शन मुळे होतो. हा जंतू खाद्य पदार्थांद्वारे पसरतो, जास्तकरून non-veg मधून. पुण्यात सध्या GBS ची साथ सुरु आहे त्यामुळे बाहेर खाणे किंवा बाहेर पाणी पिणे टाळा.

पोटाचे इन्फेक्शन झाल्यावर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती इन्फेक्शन बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. सहसा फायटर सेल्स  जंतूना अटॅक करतात व त्यांना मारून टाकतात GBS या आजारामध्ये हे फायटर सेल  स्वतःच्या शरीराच्या इम्यून सिस्टीमला अटॅक करतात. यामुळे इन्फेक्शन ला मारून टाकण्याच्या ऐवजी स्वतःच्या इम्यून सिस्टिमला अटॅक करतात. इम्यून सिस्टीम कमजोर झाल्यामुळे स्नायू कमकुवत होतात.हा पॅरालीसीस हातांच्या व पायांच्या स्नायूंना होतो व श्वासाच्या स्नायूंना देखील होतो. श्वासाच्या स्नायूंना पॅरालीसीस झाल्यावर श्वास घ्यायला खूप अवघड जाते व  त्यामुळे ऑक्सिजन कमी होऊ शकतो व तातडीने दवाखान्यात ऍडमिट करावे लागते.

GBSची मुख्य लक्षणे पोट दुखी, डायरिया, ताप आणि हात व पायात ताकद नसणे ही आहेत.

GBS बरा होतो का?

80% लोकांमध्ये GBS पूर्णपणे बरा होतो 20% टक्के लोकांना बरे झाग्यावर सुद्धा थोडा अशक्तपणा राहू शकते. श्वासाचा त्रास असल्यास बरे व्हायला जास्त वेळ लागतो. प्रत्येकाच्या प्रतिकारशक्ती वर बरे होणे अवलंबून असते.

GBS झाल्यावर लवकरात लवकर  फ़िजिओथेरपी सुरु केली की लवकर रिकवरी होते.

GBS साठी उपचार काय आहे?

• औषधे : इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) आणि प्लाझ्मा एक्सचेंज (PLEX) ही औषधे तातडीनी सुरु केली जातात

• फ़िजिओथेरपीमुळे स्नायूंची ताकद वाढते व श्वासाचा त्रास कमी होतो.

शक्य तितक्या लवकर फिजिओथेरपी सुरू केल्यास पूर्ण रिकवरी होऊ शकते.

फ़िजिओथेरपीचे उपचार रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर लगेचच सुरु होते. श्वासाचा त्रास किवा रेस्पिरेटरी फेल्युर असल्यास छातीतला कफ बाहेर करण्यासाठी श्वासाचे व्यायाम करणे गरजेचे आहेत. श्वसनाच्या त्रासातून जेवढं लवकर बाहेर पडता येईल तेवढं लवकर I.C.U मधून वॉर्ड किवा रूममध्ये शिफ्ट करता येते. I.C.U मधून बाहेर आल्यावर  पायांच्या स्नायूंची ताकद वाढवण्याचे व्यायाम सुरु होतात. व्यायाम अश्या रीतींनी घेतले जातात की तुम्ही चालायला व रोजची कामे करायला मदत होईल.

GBS झाला असल्यास लवकरात लवकर फ़िजिओथेरपीस्ट ला दाखवा आणि सही सलामत यातून बाहेर पडा!

  • डॉ. सुकन्या दांडेकर
    ( न्युरोफ़िजिओथेरपीस्ट, रीहॅब स्टेशन, पुणे)

Contact us

Fill out the form below, and we will be in touch shortly.