मात्तृतावला द्या व्यायामाची साथ

मात्तृत्व प्रत्येक स्त्री च्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असतो. या गोड अनुभवाबरोबरच नवीन मातेला तितकीच नवी आवाहने सुद्धा पेलावी लागतात- बाळाला सांभाळून स्वतःची प्रकृती सुद्धा सांभाळण्याची हि कसरत असते.

गरोदरपणाचा हा काळ स्त्री साठी अतिशय नाजूक असला तरी त्यापेक्षा अधिक नाजूक काळ असतो डिलिव्हरी नंतरचा! या काळाला ‘पोस्‍टपार्टम पीरियड’ (postpartum period) असे म्हटले जाते. यशस्वी डिलिव्हरी झाल्यावर पहिल्या 6 आठवड्यांत आईला या अतिनाजूक काळातून जावं लागतं आणि स्वत:ची खूप काळजी घ्यावी लागते. या काळात आपल्याला बाळ झालं म्हणून जरी स्त्री खुश असली तरी बाळाची डिलिव्हरी करण्यासाठी तिने ज्या जखमा सोसलेल्या असतात त्या भरेपर्यंत तिला मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागतो. प्रसूतीनंतरच्या कालावधीमध्ये मातेला शारीरिक आणि मानसिक आधाराची आवश्यकता असते.

गरोदरपणानंतर प्रत्येक स्त्री पुढील समस्यांना सामोरी जाते-

१. शरीराचा ठेवणीतला बदल (posture changes)

आपलं शरीर निसर्गनियमानुसार वागतं. या नियमाप्रमाणे शरीरात बदल होणं स्वाभाविक आहे. पण गरोदरपणात स्त्रियांच्या शरीरात एका मागोमाग बदल होतात. हे असं का होतंय? हे बदल कायम स्वरुपी आहेत की तात्पुरते या प्रश्नानं अनेकजणी वैतागतात. शरीरातील बदलांमुळे घाबरतात. पण तज्ज्ञांच्या मते हे बदल स्वाभाविक असतात. वाढलेले वजन आणि होर्मोनस मधील बदल यामुळे ते होत असतात.

प्रसुतीनंतर शरीराची ठेवण लगेच पूर्वीसारखी होत नाही. या मधल्या नाजूक काळात बदललेल्या ठेवणीमुले काही त्रास होऊ शकतात. पाठदुखी, कंबरदुखी, स्तनपान करताना येणाऱ्या काही समस्या व पोटाचा स्नायुनंची कमजोरी यामुळे उदभवू शकते.

पण ही समस्या त्वरीत सोडवणं आवश्यक आहे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करता येतात, दीनचर्येत व्यायाम आणि योग यांचा समावेश करावा.

या सर्वांकरिता फ़िजिओथेरपि उपयोगी ठरते! व्यायाम कसा करावा, कधी करावा व किती करावा याचा सल्ला

तज्ञ physiotherapist देऊ शकतो!

२. पोटाच्या स्नायुनंची कमजोरी

गरोदर असताना शरीरात होणारे बदल यामुळे व प्रसूतीदरम्यान ओटीपोटाचे व योनिमार्गाचे स्नायू ताणल्यामुळे ते कमकुवत होतात. सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झालेल्या महिलांमध्ये जास्त कमजोरी दिसू शकते व त्यांना जास्त काळजी घ्यावी लागते.

पोटाचे स्नायू कमकुवत राहिले तर कंबरदुखी सारखे त्रास नंतरही वारंवार होऊ लागतात. नेमके स्नायू कमकुवत असतानाच बाळाला उचलणे, खेळवणे या शारीरिक कसरती अपरिहार्य आहेत. हे सर्व शरीरला झेपावे या साठी ओटीपोट व योनिभाग यांतील स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी काही व्यायाम प्रकार करावे.

Physiotherapist तुम्हाला अगदी सोप्प्या पद्धतीनी हे मार्गदर्शन देऊ शकतात. पोट आत ओढून घेणे या सारख्या सोप्प्या व्यायामापासून सुरवात करून, पोट कमी करायला लागणाऱ्या अवघड व्यायामापर्यंत Physiotherapist ची मदत होऊ शकते.

३. लघवीवरचे नियंत्रण कमी होणे

पटकन कोणाला सांगितली न जाणारी हि समस्या आहे. आई होण्याच्या अद्वितीय अनुभवाची ती किंमत आहे अशीच स्त्रीची भावना असते. नॉर्मल डिलिव्हरी होताना काही वेळा योनीमार्गात छेद देऊन नंतर ती जखम शिवली जाते .हे टाके भरून यायला आठ ते दहा दिवस लागतात .अवघड जागेचं दुखणं हा वाक्प्रचार इथूनच सुरू झाला असावा. या नुकत्याच प्रसूत झालेल्या या मुलींना या टाक्यांमुळे नीट बसता पण येत नाही, बाळाला पाजताना अजूनच पंचाईत होते. दुखतंय म्हणून  कोणाला मोकळेपणाने सांगताही येत नाही.

या समस्येवर किगल व्यायाम हा उत्तम उपाय आहे. योनीमार्गाचे व ओटीपोटाचे स्नायू या व्यायामांनी बळकट करता येतात. हे स्नायू बळकट झाले की लघवीवरचे नियंत्रण सुधारते व ही समस्या आटोक्यात आणता येते!

४. स्तनपान करताना होणारे मानेचे/खांद्याचे दुखणे

गरोदरपणात स्तनांचा आकार बदलतो व वजन वाढते. या वजनाचा मानेच्या व खांद्याच्या स्नायुनंवर वाढता ताण येतो. प्रसुतीनंतर बाळाला पाजायला बसावे लागते त्याचासुद्धा याच स्नायुनंवर ताण जाणवतो. चुकीचा प्रकारे वारंवार पाजायला बसले तर मान/खांदे दुखू शकतात. पोक काढून बसणे, न टेकता बसणे टाळावे.

स्तनपानाच्या वेळी विशिष्ट पद्धतीने बसल्यास हे त्रास टाळता येतात. मानेला व कंबरेला नीट आधार देऊन बसणे व फार वाकले जाऊ नये यासाठी बाळाला विशिष्ट पद्धतीने घेणे अत्यंत आवश्यक असते.

नवीन मातांचा समस्या खूप वेळा माहिती अभावे किंवा दुर्लक्षित असल्यामुळे नीट सोडवल्या जात नाहीत. योग्य वेळे उपचार न झाल्यास या समस्या नंतरही आपले डोके वर काढू लागतात…. ‘प्रसुतीनंतर हे त्रास तर होणारच’ हा विचार थोडा बदलायला हवा…. त्रास कितीही छोटा वाटत असला तरी तो बोलून दाखवणे व त्याचावर उपाय शोधणे ही नवीन माता व नवीन पालकांची जबाबदारी आहे. बाळाच्या काळजी बरोबरच त्याचा आईची ही काळजी तितकीच महत्त्वाची आहे!

प्रसवोत्तर कालावधीमध्ये योग्य दक्षता व योग्य व्यायाम केल्यास मात्तृत्वाचा हा अनुभव अधिक सुकर होऊ शकतो! नवीन मात्तांना मदत करणारे विशेष तज्ञ फिजिओथेरपिस्ट यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो!

वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही प्रसूती हा स्त्रीचा खरोखर दुसरा जन्मच असतो. यातून जाताना स्त्रीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपणे ही आपली जबाबदारी आहे कारण सक्षम पिढी घडवायला आई सुद्धा सक्षम असली पाहिजे!!

फिजिओथेरपीसह, माता लवचिकता, ताकद, डाग ऊतक गतिशीलता तसेच असंयम सुधारू शकतात. हे मातांना त्यांच्या गर्भधारणेपूर्वीच्या फिटनेस आणि त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये परत येण्यास मदत करते.

तर, फिजिओथेरपिस्टला कधी भेट द्यायची? प्रसूतीनंतरच्या पहिल्या 6 महिन्यांच्या आत किंवा नंतर फिजिओथेरपिस्टला भेटता येते.

 तुमच्या मातृत्वाला योग्य तो फिटनेस द्या!

  • By Dr. Disha Shah

(MPT in Community Physiotherapy)

Check Your Shoulder
SOLUTIONS TO YOUR PAINFUL SHOULDER!

DO you have shoulder Pain? Or you know anybody with shoulder pain?*

DO you have shoulder Pain? Or you know anybody with shoulder pain?*

Can you sleep on your painful shoulder?

Can you sleep on your painful shoulder?

Can you lift your arm above your head easily?

Can you lift your arm above your head easily?

Have you stopped any activity because of shoulder problem?

Have you stopped any activity because of shoulder problem?

Can you take weight on your hands like in doing a plank

Can you take weight on your hands like in doing a plank

Contact us

Fill out the form below, and we will be in touch shortly.